नाणेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग. जुन्नर आणि कोंकण ह्यांना जोडणारा हा घाट. ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले. त्यापैकी एक आणि नाणेघाटाचापाठीराखा म्हणजेच जीवधन किल्ला ह्याच किल्ल्याची थोडक्यात माहिती आपल्या “माहिती भटकंती” सिरीज मार्फत आपण घेणार आहोत.गडावर जाण्यास जवळपास एक तास लागतो. ट्रेक सोपी ते मध्यम श्रेणीत येतो.
महाराष्ट्रातील एक कमी शोधलेला ट्रेक म्हणजे मुंबईतील कल्याण आणि पुण्याजवळील नाणेघाट ट्रेक . हा ट्रेक रंजक बनवतो तोम्हणजे त्याचे ऐतिहासिक महत्त्व!! सुंदर निसर्गदृश्ये, विशेषत: पावसाळ्यात, प्राचीन सातवाहन लेणी, ट्रेकिंगचा असामान्य मार्ग आणि सतत ताज्या पावसाच्या पाण्याने वाहून जाणारा पायऱ्यांमुळेनाणेघाट ट्रेक संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ट्रेक आहे.