जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

आमच्याबद्दल

जुन्नर वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जुन्नर वन विभागाचे प्रतिनिधित्व करतो. येथे आपणास वन विभागाच्या विविध उपक्रमांची, योजनांची आणि प्रकल्पांची माहिती मिळेल.

जुन्नर वन विभागाचा उद्देश वनांचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करणे हा आहे. आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणीय संतुलन राखण्याचा आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाइटच्या माध्यमातून आपणास आमच्या विभागातील ताज्या घडामोडी, वनसंपत्तीची माहिती, वन्यजीवांचे संवर्धन, पर्यावरणीय उपक्रम आणि स्थानिक समुदायांच्या सहभागाबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

आपणास जुन्नर वन विभागाच्या कार्यप्रणाली, आमचे उद्दिष्ट, आणि विविध उपक्रमांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया आमच्या वेबसाइटवरील विविध विभागांचा अभ्यास करा. आपले अभिप्राय आणि सूचना आम्हाला नेहमीच स्वागतार्ह आहेत, कारण आपल्यासह पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.

अलेक्झांडर गिब्सन ( १८००-१८६७) यांचे जुन्नर येथील समाधी स्थळ.
(सबंध भारताचे पहिले मुख्य वनसंरक्षक)

अलेक्झांडर गिब्सन हे एक प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ आणि वन अधिकारी होते ज्यांनी भारतीय उपखंडात वन व्यवस्थापन आणि वनस्पतीशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी जुन्नर येथे मुख्य वनसंरक्षक म्हणून कार्य केले आणि त्या काळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण कार्ये केली.

इतिहास

घोड प्रकल्प वनविभाग जुन्नर हे कार्यालय सन १९६४ मध्ये पुणे वनसंरक्षक पुणे मधून स्थापन करण्यात आले आहे. पूर्वी हा विभाग पुणे वनविभागाचा एक भाग होता. जुन्नर वनविभागाचे कार्यक्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या चार तालुक्यातील वनक्षेत्राचा समावेश आहे. प्रशासकीय कामांचे दृष्टीकोनातून चार तालुक्यात जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण, शिरुर अशी एकूण सात वनपरिक्षेत्रे आहेत. त्यामध्ये शिरुर वगळता जुन्नर, आंबेगाव, खेड हे तालुके पश्चिम पटटयाचे वनक्षेत्रात येतात. जुन्नर वनविभागाचे कार्यक्षेत्रात पुणे जिल्हयातील एकूण भौगोलिक क्षेत्र 5826 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी वनक्षेत्र 586.53 चौरस किलोमीटर आहे.

या वनविभागाच्या पश्चिम भागात दाट वने आहेत. या वनांमध्ये आंबा, नीम, चंदन, खैर, हिवर, आपटा, कळंब, साग इत्यादी वृक्ष आहेत. तसेच गवत, घायपात, बाभूळ, शमी इत्यादी काटेरी वनस्पती आढळतात. या वनांमध्ये बिबटया, लांडगा, मोर, व इतर वन्यप्राणी आढळतात. प्रकरणी आंबेगाव तालुक्यात भिमाशंकर येथे अभयारण्य आहे. या अभयारण्याचा काही भाग ठाणे जिल्हयात पसरला आहे. या अभयारण्यात भारतातील सर्वात मोठी शेकरु ही उडणारी खार आढळते. शेकरु हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. या अभयारण्यात भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदीर आहे. या अभयारण्यात विविध औषधी वनस्पती आणि कारवी ही वनस्पती आढळते.

Area Under Junnar Division

Forest area
Sq.Km
Geographical area Sq.Km
% of forest
area
586.53582610.06

आपण जुन्नर वनक्षेत्रात आहात का?

मंत्री मंडळ

मा. श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री,
महाराष्‍ट्र राज्‍य

मा. श्री.एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री,
महाराष्‍ट्र राज्‍य

मा. श्री. अजितदादा पवार

मा. उपमुख्यमंत्री,
महाराष्‍ट्र राज्‍य

मा. श्री. गणेश नाईक

मा. वनमंत्री
महाराष्‍ट्र राज्‍य

श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी

मा. प्रधान सचिव, वनविभाग महाराष्‍ट्र राज्‍य

श्रीमती शोमीता बिश्‍वास, भावसे

प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्‍ट्र राज्‍य

श्री. एन. आर. प्रवीण

मुख्य वनसंरक्षक, पुणे

जुन्नर वनविभाग अधिकारी

श्री.अमोल रामभाऊ सातपुते (भा.व.से)

उप वनसंरक्षक, जुन्नर

श्रीमती.स्मिता शैलेश राजहंस (म.व.से)

सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर

श्री. अमृत पांडुरंग शिंदे (म.व.से)

सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर

श्री प्रदिप लक्ष्मण चव्हाण

परिक्षेत्र अधिकारी, जुन्नर

श्री. एल .व्ही. ठोकळ

परिक्षेत्र अधिकारी, ओतूर

श्री. भोसले विकास माणिक

परिक्षेत्र अधिकारी, मंचर

श्री. कुणाल कालिदास लिमकर

परिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव

श्री .यादव उत्तमराव जाधव

परिक्षेत्र अधिकारी, खेड (अतिरिक्त कार्यभार)

श्री संतोष श्रीपती कंक

परिक्षेत्र अधिकारी, चाकण

श्री. प्रताप बाळासाहेब जगताप

परिक्षेत्र अधिकारी, शिरूर

जुन्नर वनसौंदर्य

वनस्पती आणि वन्यजीवांची सुंदरता

जुन्नर वनविभागाची रचना

अधिकाऱ्यांची यादी आणि तपशील

Harrison Hudson

WordPress Dev.

Elizabeth Sofia

WordPress Dev.

Charlie Cooper

Front-End Dev

Lucy Evelyn

Ui/UX Designer