Skip to main content

जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: 📍 शिरूर • जुन्नर • आंबेगाव • खेड तालुके 🚨 टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1800 3033|नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

एतिहासिक पार्श्वभुमी असलेला किल्ला

किल्ला हडसर

हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवातकरून जीवधनचावंडशिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

प्रवेशद्वार

हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे ही कोरिव कलेचा उत्तम नमुना आहे. एकसंघ कातळात कोरलेली दोन प्रवेशद्वारे व पायऱ्या हे या गडाचे वैशिष्ट्य आहे. 

पाण्याचे टाके कातळात कोरलेली कोठारे – 

येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे मराठाकालीन बांधणीचे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरचा नंदी भव्य व लक्षवेधी आहे.

तलाव महादेवाचे मंदिर

येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडातगणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे.

इतिहास

इ.स. 1636 मध्ये किल्ले माहुली येथे मुघल व आदिलशाहीच्या संयुक्त फौजांशी झालेल्या तहानुसार शहाजी महाराजांना हा किल्ला मुघलांच्या सुपुर्द करावा लागला. पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे. इ.स. 1671-72 या काळात हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.

गाईड यादी

उमेदवाराचे नांवगावमोबाईल नंबर
कोमल सोमा जोशीहडसर7498951479
योगिता विलास रावतेखटकाळे8010853668
गायत्री दशरथ पठारेखामगांव7875860825
कोंडीबा गेणू शेळकेहडसर9112104049
वैशाली प्रभाकर मुंढेराजूर नं. 29309125281