सिंदोळा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात स्थित आहे. माळशेज घाटाच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला जुन्नरच्या वायव्य दिशेला, मढनेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोऱ्यात आहे. या किल्ल्याची निर्मिती तत्कालीन माळशेज घाट वाहतूक मार्ग, किल्ले निमगिरी कडे जाणारा मार्ग व परिसरावर टेहळणी करण्यासाठी केली गेली होती.
इतिहासः इ.स. १६७२-७३ दरम्यान स्वराज्यातील शिलेदार नावजी बलकवडे यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला.
किल्ल्याचे स्थापत्य आणि रचना: उंचीने जास्त असलेला परंतू विस्ताराने कमी असलेल्या या गडावर प्रवेशव्दाराचे तटबंदी लगत हनुमान व गणपती ची कातळ कोरीव मूर्ती दिसते. याच बरोबर प्रवेशव्दाराचा बुरुज, थोड्याफार तटबंदीचे अवशेष, ५ ते ६ कातळ कोरीव पाण्याच्या टाक्या व गड पठारावर चौथाऱ्यांचे आवशेष आपणास पहावयास मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावरून चावंड, हडसर, निमगिरी, हरिश्चंद्रगड आणि इतर पर्वतराजीचे सुंदर दृश्य पहावयास मिळते. किल्ल्याच्या परिसरातील जंगल आणि जैवविविधता देखील आकर्षणाचे केंद्र आहेत.
जाण्याचा मार्ग:
सिंदोळा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण अहमदनगर-कल्याण मार्गाचा वापर करू शकता. माळशेज घाटामधील खुबी फाट्यापर्यंत गाडीने जाऊन तिथून पायपीट करून किल्ल्यावर पोहोचता येते. खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ल्याचा डोंगर दिसतो. या मार्गाने आपण सुमारे ४ कि.मी. चालत किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकता.
गडावरील ठिकाणे:
सिंदोळा किल्ल्यावर जाण्यासाठी आपण डोंगरधारेतील खिंडीतून पुढे जातो. हा मार्ग आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी आणून सोडतो. जिथून पुढे पायऱ्यांचा चढाव आहे. या पायऱ्या तुटलेल्या असल्या तरी त्यातून पुढे जाताना आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. दरवाजाचे आणि तटबंदीचे काही अवशेष आजही शिल्लक आहेत. गडपठावरुन पूर्वेच्या बाजूस असलेल्या पिंपळगांव जोगा जलाशयाचे विहंगम दृष्य आपण पाहू शकतो.
उमेदवाराचे नांव | गाव | मोबाईल नंबर |
---|---|---|
रविंद्र जयराम हांडे | उंब्रज | 9284212213 |
विशाल सुभाष घुले | ओतूर | 9158466043 |
सावळेराम नाना वायाळ | ओतूर | - |
मयुर मच्छिंद्रनाथ आहेर | भुंडेवाडीमढ | 8999929669 |
श्रेयस मदन खळदकर | ओतूर | 7385951661 |
वैभव विठ्ठल फाफाळे | ओतूर | 7741859214 |
संकेत दत्तात्रय वामन | काळवाडी | 9309822849 |
प्रकाश केरु चकवे | मढ | 9552681782 |
संदिप तानाजी मेहेर | उदापूर | - |
सुदर्शन बाळासाहेब कांबळे | डिंगोरे | - |
सुवर्णा बाळू दुधवडे | सितेवाडी | 7420034294 |
शुभम महेंद्र डुंबरे | ओतूर | 9860505723 |
संजय वामन साबळे | तळमाची | 9096979402 |
अवधुत पंढरीनाथ शिंगोटे | ओतूर | 9730759988 |
मंदार धोंडू अहिनवे | ओतूर | 9890405325 |
प्रकाश दशरथ लोखंडे | मढ | 8443668753 |
संदेश तान्हाजी पानसरे | मढ | 8766844793 |
निशा रघुनाथ साबळे | तळमाची | 7499578516 |
पियुष विजय खरात | ओतूर | 7709222067 |
सुवर्णा धोंडू साबळे | तळमाची | 8788050304 |