जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

जुन्नरच्या पठारांचा संवर्धन आराखडा तयार करणार

जुन्नर, ता. २२ : जुन्नर वन विभागाच्या पुढाकाराने विविध शासकीय विभागाचे कर्मचारी व शेकडो शिवप्रेमींनी रविवारी (ता. २२) किल्ले शिवनेरीवर स्वच्छता मोहीम राबविली. या अभियानात दुर्ग प्रेमींनी एक ट्रक प्लास्टिक व इतर कचरा गोळा करत शिवनेरी गड कचरा मुक्त केला. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान शिवनेरीवर सुरू राहणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत किल्ले शिवनेरीचा समावेश असल्याने किल्ल्याची पाहणी करण्याससाठी युनेस्कोची समिती येणार आहे. यासाठी महावारसा स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या स्वच्छता अभियानात प्रत्येकाचा सहभाग असावा यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला. वनविभाग, पंचायत समिती, पुरातत्त्व विभाग, पोलिस दल, नगर परिषद, तहसील कार्यालय या सर्व शासकीय विभागांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. तसेच श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर रेस्कू टीम, अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर, सह्याद्री प्रतिष्ठान, जयहिंद पॉलिटेक्निक, प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, गिरी प्रेमी, स्थानिक ग्रामस्थ, मुरबाड तालुक्यातील गडप्रेमी सहभागी झाले होते.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी उपस्थितांना स्वच्छता अभियानाबाबत मार्गदर्शन केले. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत किल्ले शिवनेरीसह ११ किल्ल्याचा मराठा लष्करी भूप्रदेश समाविष्ट होण्यासाठीच्या प्रयत्नाचा भागीदार होण्याची सदर स्वच्छता अभियान ही एक मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी उपस्थितांना स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचा मंत्र दिला. वनविभागाच्या वतीने उपस्थितांना मास्क, हातमोजे, झाड, पिशव्यांचे वाटप करण्यात आले.नगरपरिषदेने घंटागाडी उपलब्ध करून दिल्या होत्या. या स्वच्छतेत सहभागी झालेल्या सर्व संस्थांचा सन्मान जुन्नर वनविभागाने प्रकाशित केलेले ‘देवराई’ हे पुस्तक देऊन यावेळी करण्यात आला व स्वच्छता अभियानाची सांगता झाली.