लेण्याद्री बुद्ध लेणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थित आहेत. हे स्थान सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले आहे आणि अष्टविनायकांपैकी एक, गिरिजात्मज लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे.
परिचय
लेण्याद्री लेण्यांच्या आठव्या गुहेत गिरिजात्मज गणपतीचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात पोहोचण्यासाठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे एका अखंड दगडापासून बनलेले आहे आणि डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती आहे, त्यामुळे त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात. हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे, जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख ‘जीर्णापूर’ व ‘लेखन पर्वत’ असा आढळतो. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे, त्या गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये असल्याने याला लेण्याद्री असे नाव पडले आहे.
याच डोंगररांगांमध्ये प्राचीन व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह आढळतात. महाराष्ट्रातील प्राचीन बुद्ध लेणींना त्या काळात अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. जुन्नरमध्ये भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेल्या कोरीव कामांची संख्या ३२५ आहे. यात चैत्यगृह, विहार, पोढी व लेणी आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे “लेण्याद्री बुद्ध लेणीं”.
प्रमुख लेणीं
गुंफा क्रमांक १४ एक चैत्यगृह आहे. या गुंफेचा मंडप आयताकार असून छत सपाट आहे. चैत्यगृहाला व्हरांडा असून, व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृहासाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारणतः इ.स. २ रे शतक आहे.
सुलेमान लेणी
मूळ नाव
लेण्याद्री लेण्यांचे मूळ नाव “कपिचित बुद्ध लेणीं” असे होते. याचे कारण म्हणजे या लेण्यांवर असलेल्या वानरांचा वावर होय! पाली भाषेत ‘कपि’ म्हणजे वानर किंवा माकड आणि ‘चित’ म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे. म्हणजेच “जेथे वानर एकत्रित राहतात” किंवा “वानरांना आवडणारी जागा” म्हणजे कपिचित! प्राचीन काळापासून येथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्या काळात इथे लेणीं कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणीं समूहाला “कपिचित बुद्ध लेणीं” असे संबोधले होते. शिलालेखात ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण या ठिकाणी ४० शैलगृह असून मुख्य ३० शैलगृह पूर्व-पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्र. ६ व १४ हे चैत्यगृह आहेत, म्हणजेच प्रार्थनास्थळ, आणि बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.
प्रमुख चैत्यगृह
गुंफा क्रमांक ६ हा या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तूप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.स. २ र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख आहे.
गुंफा क्रमांक ७ ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा (विहार) आहे. बाकिच्या इतर गुंफा विहार लहान असून काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असा गणला गेला आहे.
लेण्याद्री लेण्यांमध्ये मध्ययुगातील १७व्या शतकात भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देऊन तिथे “गिरिजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असून “गिरीजात्मज” नावाने प्रसिद्ध आहे.
उमेदवाराचे नांव | गाव | मोबाईल नंबर |
---|---|---|
केतन राम ताम्हाणे | - | - |