जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

बिबट अज्ञात जीवन

Picture3 web

बिबट्याचे जीवशास्त्र

लांबी – १७० ते २८० सेमी.
वजन – ३५ ते ६५ किलो ( नर ) , ३० ते ५० किलो ( मादी )
  ऊंची – ४३ ते ७६ सेमी.
कलर – साधारणता पिवळसर व शरीरावर काळ्या रंगाचे  ठिपके असतता त्यांना रोजेट्स (Rossets) असे म्हणतात.प्रत्येक बिबट्याचे ठिपके हे वेगळे असतता. हवामाना नुसार बिबट्याच्या रंगा मध्ये थोडाफार फरक असतो.
आयुष्मान – १५ ते १७ वर्ष    व पिंजर्‍यामध्ये २० ते २२ वर्ष
baj

बिबट्याचे दात व नखे

दुधाचे दात – २६
कायमस्वरूपी दात – ३०
सुळे – ४
पुढील दोन्ही पाय मिळून १० नखे असतात व मागील पायास ८ असे एकूण १८ नखे असतता.
बिबट्या हा ग्रोलींग इये स्वाईंग ( Growling & Sawing Sound) सारखा आवाज काढतो.
baj2

बिबट्याचे प्रजनन

गर्भधारणा कालावधी – ९० ते १०५ दिवस.
पिल्लांची संख्या – १ ते ४
वयात येण्याचा कालावधी – २४ ते ३६ महिने
पिल्लांचा मृत्यु दर – ५० टक्के
baj3

बिबट्याच्या पिल्लांविषयी

1. बिबट्याच्या नवजात पिल्लाचे वजन ४०० ते ५०० ग्रॅम असते.
2. ९ ते ११ दिवसानंतर पिल्लांचे डोळे उघडतता.
3. २० दिवसानंतर पिल्लांना ऐकायला येते.
4. ४० दिवसापर्यंत पिल्ले रांगतात त्यांनतर चालायला लागतात.
5. २ महिन्या नंतर पिल्ले खाद्य खाण्यास सुरवात करतात.
6. साधारणता २ ते ३ वर्ष पिल्ले आई सोबत राहतात व नंतर वेगळी होताता.
baj4

बिबट्याचे खाद्य

1. लहान  पशुपक्ष्यानपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत शिकार करतो .
2. पाळीव प्राणी ( कुत्रा, शेळी, बकरी )
3. वजना पेक्षा २ ते ३ पट शिकार झाडावर उचलून नेऊ शकतो.
4. एकदा शिकार केल्यास तो २ ते ३ दिवस न खाता ही राहू शकतो.
5. शिकार जर भेटली नाही तर तो उंदीर , पाण्यातील मासे किवा काही वेळेस खेकडे व बेडूक सुद्धा खातो.
baj5

बिबट्याच्या स्वभावाविषयी

1. बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी आहे. Panthera Pardus हे शास्त्रीय नाव आहे.
2. बिबट्या हा आफ्रिका, मध्य आशिया,कोरिया,मलेशिया,भारत व चीन याच बरोबर जगात सगळीकडेच आढळून येतो.
3. बिबट्या निशाचर प्राणी आहे.
4. बिबटया हा स्वताच्या भागात राहतो.
5. परिस्थिशी समरस होऊन जुळवून घेणारा प्राणी आहे.
6. बिबट्या हा चांगल्या प्रकारे झाडावर चढू शकतो व पाण्या मध्ये पोहू शकतो.
baj9 1

मानव बिबट संघर्ष

1. औद्योगीकरण / शहरीकरण.
2. जंगलांचे कमी झालेले प्रमाण.
3. जंगलांना लागणारी आग.
4. जंगलातील वन्य प्राण्याचे कमी झालेले प्रमाण.
5. पाण्याची कमतरता.
6. पीक पद्धतीत झालेले बदल.
7. भटकी / पाळीव प्राण्याची वाढलेली संख्या.
8. जनजागृती अभाव.
baj10

बिबट गावाजवळ किवा गावात घुसल्यास...

1. माहिती तपासून पहा.
2. वनविभागाला घटनेची माहिती द्या.
3. दगड काठ्या मारू नका.
4. त्या परिसराला प्रतिबंद करा.
5. प्राण्याला घेरू नका किवा त्याचा पाठलाग करू नका.
6. लहान मुलांना व वयस्कर नागरिकांना सुरक्षित ठेवा.
7. लोकांनी आपापल्या घरात सुरक्षित रहा.
baj12 1

पिल्ले गावाजवळ किवा शेतात दिसल्यास

1. पिल्लांना हात लाऊ नका.
2. गरज असल्यास पिल्लांना सुरक्षित व लोकांपासून दूर ठेवा .
3. त्यांना कोणतेही खाद्य देऊ नका.
4. वनविभागाला घटनेची माहिती द्या.
5. पिल्ले व त्याची आई याची पुनर्भेट होण्यासाठी पिल्ले त्या ठिकाणी सायंकाळी ठेऊन द्या.
baj14 1

बिबट विहरीत पडल्यास

1. वनविभागाला घटनेची माहिती द्या.
2. लोकांनी विहारी जवळ गर्दी करू नये.
3. विहरी मध्ये प्राण्याला आधारासाठी लाकडी ओंडका किवा बाज टाका .
4. त्या परिसराला प्रतिबंद करा.
5. वनविभागाचे कर्मचारी/रेस्क्यु टीम येईपर्यंत दक्षता घ्या.
baj7

वन्यप्राण्यांचे ठसे