जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

छत्रपती शिवराय वनउद्यान - दि. 30/06/2024

लोकार्पण उद्घाटन कार्यक्रम

प्रस्तावना

जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. सदर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड, हडसर, निमगिरी, जिवधन , नारायणगड , इत्यादी किल्ले व नाणेघाट यांसारखे पर्यटन स्थळे आहेत. त्याचप्रमाणे जुन्नर तालुका हा जैवविविधतेने नटलेला आहे. येथे मोर, बिबट, सांबर, तरस, कोल्हा, वानर, माकड, रानडुक्कर, विविध प्रकारचे सर्प, विविध प्रकारची फुलपाखरे, पक्षी या ठिकाणी आढळून येतात. त्याचप्रमाणे हिरडा, बेहडा, आवळा इत्यादी वनऔषधी तसेच विविध स्थानिक वनस्पती प्रजाती अढळून येतात. त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे किल्ले शिवनेरी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असून येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्त येत असतात.

प्रकरणी जुन्नर तालुक्यातील पर्यटनास चालना मिळावी त्याचप्रमाणे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक लोकांना जैवविविधतेचे महत्त्व अवगत व्हावे या उ‌द्देशाने किल्ले शिवनेरीचे पायथ्याशी “छत्रपती शिवराय वनउद्‌द्यान” उभारण्यात आलेले आहे. सदर उ‌द्यानामध्ये खालीलप्रमाणे सर्व कामे ही निसर्गानुरूप करण्यात आलेली आहेत. ज्यामाध्यमातून पर्यटकांना इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरेची ओळख होईल.

उ‌द्यानाचे काम (Garden)

किल्ले शिवनेरीचे पायथ्याशी “छत्रपती शिवराय वनउद्‌द्यान” येथे फुलांची सजावट, लँडस्केपिंग आणि तेथे हिरवळ लॉन तयार करुन उद्यान तयार करण्यात आलेले आहे. ज्यामुळे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. स्वच्छ हवा, हरियाली, आणि शांत वातावरण असल्याने तेथे वेळ घालवणे पर्यटकांच्या आरोग्यासाठी फाय‌द्याचे होईल. सदर उ‌द्यानांमध्ये विविध वनस्पती आणि वृक्षांचे संगोपन केले आहे. उ‌द्यानांचे जतन आणि व्यवस्थापन हे पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे.

पर्यटकांकरिता निवासस्थान

जुन्नर तालुका हे पर्यटन क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. पर्यटकांसाठी निवासस्थान उपलब्ध करून देणे ही पर्यटनाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. निवासस्थान हे पर्यटकांना आराम, सुरक्षितता, आणि आनंददायी अनुभव देतात. त्याअनुषंगाने “छत्रपती शिवराय वनउद्‌द्यान” मध्ये असलेल्या 4 निवासस्थानाचे नुतनीकरणाचे काम करण्यात येऊन ते पर्यटकांना निवासाकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रोपवन कामे (Plantation Work)

रोपवन कामामुळे उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य वाढले आहे. विविध रंगी- बेरंगी फुलं, झाडं आणि वनस्पती पर्यटकांना आकर्षित करतात. सदर रोपवन माध्यमातून विविध प्रकारच्या स्थानिक आणि दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते, ज्यामुळे जैवविविधता टिकून राहण्यास मदत होईल. सदर रोपवनामध्ये एकूण फूलझाडांची लागवड करण्यात आलेली असून त्याचे संगोपन करण्यात येत आहे.

पंचकर्म पाथवे

सदर पंचकर्म पाथवे वाळू, लाल माती, मुरुम, हरळी (हरियाली), खडी इत्यादी पाच नैसर्गिक मुल्यांपासून बनविणेत आलेला आहे. पंचकर्म पाथवे पर्यटकांना एक उत्कृष्ट अनुभव देते तसेच आरोग्य सूदृढ ठेवण्यास मदत करते. तसेच पंचकर्म पाथवे च्या माध्यमातून पर्यटकांना आपली संस्कृती व पर्यावरणाचे महत्त्व याबददल अधिक जाणीव होईल. पंचकर्म उपचार हे आयुर्वेदातील शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. हे उपचार शारीरिक आणि मानसिक शांतीसाठी उपयुक्त असतात.

दगडांवरील जैवविविधतेचे छायाचित्र

“छत्रपती शिवराय वनउ‌द्याना” मध्ये विविध जैवविविधतेचे छायाचित्र हे दगडावर रेखाटण्यात आलेले आहे. या माध्यमातून पर्यटकांना प्राकृतिक सौंदर्याचा अ‌द्वितीय अनुभव मिळेल. तसेच लहान मुलांना रंगी-बेरंगी प्राणी पक्षी यांच्या छायाचित्रांबाबत एक आत्मियता असल्याने सदर दगडावरील

छायाचित्रांव्दारे त्यांचेमध्ये लहानपणीपासूनच निसर्ग व त्याची जोपासना करण्याबाबत जाणीव निर्माण होण्यास मदत होईल.

दगडी प्रवेशव्दार

दगडी प्रवेशद्वार ऐतिहासिक वास्तूंचा एक भाग असतात. सदर प्रवेश‌द्वारामुळे पर्यटकांना त्या स्थळाच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि परंपरेची ओळख होईल.

वनतळे

उ‌द्यानाचे संवर्धन व संगोपनाचे व्यवस्थापन करणेकरिता वनतळे ची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सदर वनतळयाचे माध्यमातून वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते.

खुली व्यायामशाळा (Open Gym)

बाहेरील खुल्या व्यायामशाळा पर्यावरणाशी अधिक सुसंगत असतात. पर्यटकांना नैसर्गिक वातावरणात व्यायाम करण्याचा आनंद मिळतो, ज्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. प्रकरणी जुन्नर शहरातील बहुसंख्य लोक हे पहाटे व सायंकाळी च्या वेळी आरोग्य चांगले रहावे याउददेशाने शिवनेरी परिक्रमा रस्त्याने फेरफटका करीत असतात, या खुल्या व्यायामशाळेमुळे त्यांचे आरोग्य अधिक सुदृढ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य सुधारणेमध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल.

बांबू पॅगोडा

बांबू पॅगोडा हे स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या अनोख्या रचनात्मक शैलीमुळे ते पर्यटकांना आकर्षित करतात. प्रकरणी उद्द्यानामध्ये बांबू पॅगोडा उभारण्यात आलेला आहे. सदर बांबूचा वापर करून बनवलेल्या पॅगोडयाचे माध्यमातून पर्यावरणीय जाणीव वाढवण्यास मदत होईल. पर्यटकांना पर्यावरणास अनुकूल वास्तुकलेचे महत्त्व समजेल आणि त्यांना पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा मिळेल.

दगडी पाथवे

दगडी पाथवेवर चालण्यामुळे पर्यटकांचे शारीरिक आरोग्य सुधारते. हे पाथवे चालण्यासाठी उत्तम असतात, ज्यामुळे पर्यटकांना ताजेतवाने वाटते आणि त्यांच्या फिटनेसला चालना मिळते.

जैवविविधता माहितीफलक

जैवविविधता माहितीफलक पर्यटनाच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे असून सदर माहितीफलकाव्दारे पर्यटकांना शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि पर्यावरणीय माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.