जुन्नर वन विभाग
हडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवातकरून जीवधन, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.
• प्रवेशद्वार
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे ही कोरिव कलेचा उत्तम नमुना आहे. एकसंघ कातळात कोरलेली दोन प्रवेशद्वारे व पायऱ्या हे या गडाचे वैशिष्ट्य आहे.
• पाण्याचे टाके व कातळात कोरलेली कोठारे –
येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे मराठाकालीन बांधणीचे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरचा नंदी भव्य व लक्षवेधी आहे.
• तलाव व महादेवाचे मंदिर
येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडातगणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे.
इ.स. 1636 मध्ये किल्ले माहुली येथे मुघल व आदिलशाहीच्या संयुक्त फौजांशी झालेल्या तहानुसार शहाजी महाराजांना हा किल्ला मुघलांच्या सुपुर्द करावा लागला. पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे. इ.स. 1671-72 या काळात हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.