जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

माळशेज घाट

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर – कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’ इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

इतिहास

या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते

परिवहन पर्याय:

रस्ता मार्गाने (By Road):

  • मुंबईहून: मुंबईहून माळशेज घाटाकडे जाण्यासाठी, मुंबई-नाशिक महामार्ग (NH 160) वापरून माळशेज घाटाच्या दिशेने जा. मुंबईपासून सुमारे 120 कि.मी. अंतरावर आहे. प्रवासात साधारणतः 3-4 तास लागतात.
  • पुण्याहून: पुण्याहून माळशेज घाटाच्या दिशेने जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्ग (NH 60) वापरून जावे. पुण्यापासून सुमारे 127 कि.मी. अंतरावर आहे. प्रवासात साधारणतः 3 तास लागतात.
  • कल्याणहून: कल्याणहून माळशेज घाटाच्या दिशेने जाण्यासाठी सुमारे 96 कि.मी. अंतरावर आहे. प्रवासात साधारणतः 2 तास लागतात.

बस सेवा (By Bus):

  • एसटी बस सेवा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)च्या बसेस माळशेज घाटापर्यंत पोहोचतात. कल्याण, पुणे, मुंबई येथून थेट माळशेज घाटासाठी बसेस उपलब्ध आहेत.

खासगी वाहतूक (Private Transport):

  • जर तुम्ही स्वखाजगी वाहनाने प्रवास करत असाल, तर तुम्ही माळशेज घाटाच्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचू शकता. मुख्य रस्त्यावरून माळशेज घाटाच्या परिसरात पोहोचण्यासाठी काही अंतर पायी प्रवास करावा लागेल

गाईड

. बाळू कावजी मेमाणे 9158540512

. लक्ष्मण संतू मेमाणे 9049161862