हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. हा जोड किल्ला या प्रकारातील असुन मधल्या खिंडीने हनुमंत गड व निमगिरी असे एकाच डोंगरावर असलेले दोन किल्ले विभागलेले आहेत. मध्ययुगीन काळामध्ये नाणेघाट या व्यापारी मार्गाचे संरक्षण करणारा हा किल्ला होता. जुन्नर शहरापासुन 25 कि.मी. पासून हा किल्ला आहे.
गडचढणीच्या मार्गामध्ये डोंगराच्या कातळात अर्धवट कोरलेली लेणी दिसते येथूनच कातळकोरीव पायऱ्यांची वाट सुरु होते. या वाटेच्या खाली एक पायवाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंत गड यांच्या मधील खिंडीमध्ये जाते. या वाटेने आपण 15 मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडींच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. उजव्या बाजूला असलेल्या कातळ कोरीव पायऱ्या यांच्यासाहाय्याने आपण 10 मिनिटात निमगिरीच्या गड माथ्यावर पोहोचतो.
इतिहास
निमगिरी किल्ला १२ व्या शतकात बांधला गेला, आणि विविध राजवंशांनी यावर शासन केले. किल्ला आपल्या सुरक्षात्मक रचनामुळे आणि सामरिक महत्वामुळे प्रसिद्ध होता. ऐतिहासिक काळात हा किल्ला महत्त्वाच्या युद्धकाळातील स्थळांमध्ये गणला जातो. आजही किल्ल्याचे अवशेष त्या काळच्या शौर्याचे प्रतीक आहेत.