जीवधन किल्ला
नाणेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग. जुन्नर आणि कोंकण ह्यांना जोडणारा हा घाट. ह्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले. त्यापैकी एक आणि नाणेघाटाचा पाठीराखा म्हणजेच जीवधन किल्ला .
ट्रेक बद्दल: कधी तुम्ही स्वतःला दोन डोंगरांच्या मध्ये दोरीवर लटकलेले कल्पना केली आहे का!!
कल्पना करा की तुम्ही दोन डोंगरांच्या मध्ये दोरीवर लटकलेले आहात, आणि खाली हजारो फूटांची दरी आहे. जर ही चक्कर येण्यासारखी स्थिती तुम्हाला रोमांचित करते, तर तुम्ही नक्कीच दरी पार करण्याचा आनंद घ्याल.दरी पार करणे ही एक साहसी गतिविधी आहे ज्यात एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर दरी पार करणे समाविष्ट आहे, यासाठी फक्त दोरींचा वापर केला जातो, ज्यांच्या दोन टोकं दोन डोंगरांवर सुरक्षितपणे बांधलेली असतात. मग सहभागी एक हार्नेस घालतात आणि दोरींवर चढून जमिनीपासून अनेक फूट उंचावरून पार करतात.
जीवधन किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा
गडावर जाण्यास जवळपास एक तास लागतो. ट्रेक सोपी ते मध्यम श्रेणीत येतो. किल्ल्याची उंची जवळपास 3757 फूट एवढी असून घाटघर हे पायथ्याचे गाव. गडावर जाण्याच्या दोन वाटा आहेत. दोन्हीही वाटांसाठी घाटघर येथून मार्ग आहे.
पहिला मार्ग म्हणजे घाटघर येथून कल्याण दरवाजा मार्गे गडावर जाणे. सुरूवातीचा मार्ग दाट जंगलातून जातो. त्यानंतर मात्र दमछाक करणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे. पायऱ्या तुटलेल्या असल्या तरी रेलिंग असल्याने सुरक्षित वाटते. ह्या पायऱ्या थेट आपल्याला कल्याण दरवाजा पर्यंत घेऊन जातात. पण दरवाजा जवळची शेवटची चढाई करण्यासाठी थोडी मशगत करावी लागते.
दुसरा मार्ग म्हणजे घाटघर पासून किल्ल्याला थोडा वळसा घालून जुन्नर दरवाजा मार्गे गडावर जाणे. दरवाजाची पूर्णपणे पडझड झालेली आहे. फार कमी पर्यटक ह्या मार्गाचा वापर करतात.
वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग
इथली सर्वात साहसी गोष्ट म्हणजे या उंच शिखरावर पोहोचल्यानंतर लोक वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग करणे. पर्यटक स्लिंग दोरीच्या साहाय्याने एका खडकावरून दुसऱ्या खडकापर्यंत पोहोचतात.
ट्रेकची माहिती:
कठीणता: रोमांचकारी गतिविधी
धैर्य:मध्यम
ट्रेक अंतर: 6 किमी (अंदाजे)
गतिविधीसाठी आवश्यक वेळ: 1 तास (अंदाजे)
गतिविधी: दरी पार करणे (220 फूट)
रॅपलिंग (350 फूट)
गडावर पाहण्याची ठिकाणे
भक्कम आणि सुस्थितीत असलेला कल्याण दरवाजा, पडझड झालेला जुन्नर दरवाजा, गुहा, धान्य कोठार, पाण्याच्या टाक्या, बालेकिल्ला येथील जिवाईदेवी मंदिर, मनात धडकी भरवणारा वानरलिंगी सुळका.
पावसाळ्यातील येथील वातावरण तर काही औरच असते. त्यात नाणेघाट जवळील रिव्हर्स धबधबा सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात घाटघर परिसरात पर्यटकांची तुडुंब गर्दी असते. ज्यामुळे स्थानिकांना त्याचा फायदा होत आहे. येथे राहण्याची खाण्याची सर्व सोयी स्थानिकांद्वारे येथे उपलब्ध केलेल्या आहेत.
वानरलिंगी सुळका म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील गिर्यारोहकांसाठी एक आव्हाहन. त्यामुळे अधून मधून रॉक क्लाइंबिंगचा, व्हॅली क्रोसिंगचा थरार येथे आपल्याला पाहायला मिळेल.