जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गिरीदुर्ग आहे. घाटघरच्या परिसरात असलेला हा पुर्वाभिमुख किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला असावा. या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. घाटघर गावातुन पुर्वेच्या दिशेने जुन्नर दरवाजा मार्ग, नाणेघाटाच्या बाजुने वनविभागाच्या जंगलातून वर जाणारा कल्याण दरवाजा मार्ग. नाणेघाटापासुन जीवधन किला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची वने हे या गावचे वैशिष्ट्य होय.
गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी तीन धान्य कोठार आहेत. याच्या प्रवेशद्वाराच्या आतील पहिल्या खोली मध्ये वेगवेगळे कोरीव नक्षीकाम पहावयास मिळते. इ.स. 1818 च्या शेवटच्या मराठे इंग्रज युद्धात या कोठारांतील धान्याला आग लावली गेली होती, त्याची राख आजही या धान्य कोठारांमध्ये राख पहावयास मिळते.
“वानरलिंगी” सुळका (खडापारशी) :-
दक्षिण विस्तार असलेल्या या गडाच्या एका टोकाला सुमारे 350 फुट उंचीचा वानरलिंगी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. या गडाच्या परिसरामध्ये नाणेघाट, नानाचा अंगठा, हडसर किल्ला, चावंड किल्ला, निमगिरी किल्ला आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर या सारखी ठिकाणे पाहू शकतो.
इतिहास
शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.१७ जून १६६३रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतूनसोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.